75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Manoj Jarange

Manoj Jarange : एकीकडे ‘संघर्षयोद्ध मनोज जरांगे पाटील’ तर दुसरीकडे ‘आम्ही जरांगे’ असे दोन सिनेमे थिएटरमध्ये लागणार आहेत. ‘आम्ही जरांगे’चा टीझर रिलीज झाला आहे.

Manoj Jarange : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 14 जून रोजी हा सिनेमा महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित आणखी एका मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. आम्ही जरांगे असं सिनेमाचं नाव असून सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे.

“कर्म मराठा, धर्म मराठा! मराठ्यांचा नवीन सरदार! ‘आम्ही जरांगे’ गरजवंत मराठ्यांचा लढा!”, असं म्हणत आम्ही जरांगे या सिनेमाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे हे या सिनेमात मनोज जरांगे यांची प्रमुख भुमिका साकारत आहेत. त्यांचा पहिला लुक टीझरमध्ये पाहायला मिळतोय. तुमच्या डोळ्यातील प्रत्येत थेंबाचा बदला घेतला जाईल असं दमदार वाक्य टीझरच्या शेवटी ऐकायला मिळतंय.

आम्ही जरांगे या सिनेमा मराठीतील प्रसिद्ध अभिनेते अजय पूरकर हे या सिनेमात माथाडी कामगार नेते ‘अण्णासाहेब पाटील’ यांच्या भुमिकेत आहेत. सिनेमातील इतर स्टारकास्ट अद्याप समोर आलेली नाही.

एकीकडे ‘संघर्षयोद्ध मनोज जरांगे पाटील’ तर दुसरीकडे ‘आम्ही जरांगे’ असे दोन सिनेमे थिएटरमध्ये लागणार आहेत. दोन्ही सिनेमे 14 जून रोजी रिलीज होत आहेत. कोणत्या सिनेमाला प्रेक्षकांचा जास्त प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” हा चित्रपट याआधी 26 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. मात्र लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर गेलं. चित्रपट आता निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर म्हणजे 21 जून 2024 रोजी रिलीज होणार आहे.

चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता रोहन पाटीलने मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख भुमिका साकारली आहे. तर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी जरांगेच्या वडिलांची भुमिका साकारली आहे. अभिनेत्री सुरभी हांडे जरांगेच्या पत्नीच्या भुमिकेत आहे.

Manoj Jarange
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...