देवेंद्र फडणवीसांनी वीज कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. वीज महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ केली आहे.
वीज कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापारेषण या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्क्याने वाढ केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय तीन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ मिळाली आहे. आता महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतनवाढ देण्यात आलेली आहे.
या निर्णयाचा लाभ कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि सहाय्यक प्रवर्गातील कामगारांना होणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ मार्च 2024 पासून ही वाढ लागू होणार आहे. पहिली पगारवाढ सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती. आरोग्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ‘टॉप अप’ करून वेगळी योजना तयार करण्याचे आदेश दिले आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात आज एक बैठक पार पडली. या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख उपस्थितीत, धनंजय मुंडे देखील ऑनलाईन उपस्थित होते.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के वाढ
ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के वाढ करण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी याची माहिती दिली.