गेल्या काही दिवसांपासून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे. मात्र राऊतांच्या शाब्दिक चकमकीतून मनोज जरांगेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना लोळवण्याचा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना लोळवण्याची भाषा केली. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास देवेंद्र फडणवीसांना लोळवणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर गेल्या काही दिवसांपासून बार्शीचे भाजपचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जोरदार जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूरात अपहरण करून मराठा तरूणाला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याचे सांगत नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार राजेंद्र राऊत यांना इशारा दिला. फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केल्याचे संजय राऊत म्हणाले. तर राजेंद्र राऊत यांच्या तोंडी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषा असल्याची टीका जरांगे पाटलांनी केली आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला.