Crime News : हिंगोलीच्या (Hingoli Crime) वसमत तालुक्यात एका तलाठ्याच्या (Talathi Murder) डोळ्यात मिर्ची टाकून त्याची हत्या (Talathi Murder) करण्यात आलाय.
Crime News : हिंगोलीच्या (Hingoli Crime) वसमत तालुक्यात एका तलाठ्याच्या (Talathi Murder) डोळ्यात मिर्ची टाकून त्याची हत्या (Talathi Murder) करण्यात आलीये. व्हॉट्सअॅप चॅटवरुन झालेल्या वादात मोठा राडा झाला. या वादातचं तलाठ्याला संपवण्यात आलंय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलय.
तलाठी पवार यांच्या डोळ्यात थेट मिर्चीची पूड टाकत चाकूने वार
अधिकची माहिती अशी की, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार हे त्यांच्या तलाठी कार्यालयात काम करत असताना प्रताप कराळे नामक तरुणाने कार्यालयात जात व्हाट्सअप्प ग्रुपवरील मेसेजवरुन वाद सुरु केला. त्यावर तलाठी पवार यांनी मी योग्यच टाकले जे टाकले असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर प्रताप कराळे नावाच्या युवकाने तलाठी पवार यांच्या डोळ्यात थेट मिर्चीची पूड टाकत चाकूने अनेक वार केले.
सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू
यावेळी तिथे असलेले शिकाऊ तलाठी बालाजी डवरे यांनी कराळे यांना धरून चाकू हिसकावून घेत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कराळे याने पोबारा केला. यानंतर तलाठी संतोष पवार यांना जखमी अवस्थेत परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ही बाब कळताच परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह सर्वच महसूल अधिकारी कर्मचारी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकत्र आले होते.
सर्व अधिकाऱ्यांसमोर पवार यांच्या कुटुंबाने टाहो फोडत आरोपीला फाशी देण्याची मागणी केलीय. संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे संभाजीनगर इथून निघाले असून संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना ते भेट देणार आहेत. पोलिसांनी यातील आरोपी प्रताप काळे याला अटक केलीय. आरोपी संतोष कराळे हा वारंवार तलाठी संतोष पवार यांना तुम्ही माझी जमीन इतरांच्या नावावर करून देताल असे म्हणत त्रास देत होता. मात्र असं करता येत नसतं अस वारंवार सांगूनही आरोपीने ऐकले नाही. त्याने आज थेट पवार यांचा निर्दयीपणे खून केलाय. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ तलाठी संघटना मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.