Crime News : वाशिमच्या कारंजा शहरामध्ये चार बहिणींनी एका महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कारंजा शहरातील गौतम नगर भागात ही घटना घडली आहे.
Crime News : वाशिमच्या कारंजा शहरामध्ये चार बहिणींनी एका महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कारंजा शहरातील गौतम नगर भागात ही घटना घडली आहे. या चार बहिणींच्या भावाचे महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, यानंतर चारही बहिणींनी मिळून महिलेला दगड विटांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये महिला गंभीर जखमी झाली. या जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला.
मृत्यू झालेली महिला आणि चार बहिणींच्या भावामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, त्यामुळे चार बहिणींनी या महिलेला मारहाण केली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी चारही महिलांना अटक करण्यात आली असून पुढील तपास कारंजा शहर पोलीस करत आहेत.
या चारही बहिणींचं वय 20-22 वर्ष ते 34-35 वर्षांमध्ये आहेत. या चारही बहिणींनी मृत महिलेच्या डोक्यात विटांनी मारहाण केली. डोक्यात जखम झाल्यानंतर महिलेला रक्ताची उलटीही झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच या प्रकरणी संशयित असलेल्या लक्ष्मण नावाच्या व्यक्तीनेही गळफास लावून जीवन संपवलं आहे.