75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून एका 50 वर्षीय महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जादूटोणा (Black Magic) करत असल्याच्या संशयावरून एका 50 वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला करून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशीमच्या धुमका (Dhumka Washim) गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, धुमका गावात सुला राठोड यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. गावातील जोजार कुटुंबियाच्या एका तरुणीवर जाधव कुटुंबातील लोकांनी जादूटोणा केल्याचा संशय जोजार कुटुंबियांना होता. यावरून गेल्या दोन महिन्यापूर्वी वाद निर्माण झाला होता. जोजार कुटुंबीयांनी सुला जाधव या पिडीतेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र या घटनेशी माझा काही संबध नाही म्हणत सुला जाधव या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. 

कैलास उत्तम राठोड, दुर्गाबाई भागवत जोजार, सचिन भागवत जोजार, सोनु भागवत जोजार, इलायती कैलास राठोड रात्रीच्या सुमारास पिडीतेच्या घरी जाऊन जबर जीवघेणी मारहाण केल्याचा आरोप जखमी पिडीत महिलेने केला आहे. घरी कुणी नसल्याचा फायदा घेत महिलेला मारहाण करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

मारहाणीनंतर संशयितांनी महिलेला एका रिक्षात दवाखान्यात उपचारासाठी नेल्याचे समजते. गंभीर जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे महिलेची प्रकृती बिघडल्याने महिलेला वाशिमच्या एका खासगी रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

या प्रकरणी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बंजारा समाजाच्या महिला आक्रमक झाल्या असून पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक (Indraneel Naik) यांच्या पत्नी मोहिनी नाईक (Mohini Naik) यांनी पीडितेची भेट घेतली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणी निवेदन देवून चौकशी करून आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...