75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Raj Thackeray

Raj Thackeray : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. यावर राज ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं. महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही असं ते म्हणाले आहेत.

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. या दौऱ्यात आता ते सोलापूरमध्ये असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधासनभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र दौरा सुरू आहे. प्रत्येक मतादरसंघातील परिस्थितीचा आढावा घेणं सुरु आहे. विधानसभेला मनसे २२५ ते २५० जागा लढवणार असल्याचं मी आधीच जाहीर केलंय असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. यावर राज ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं. आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे म्हणाले की, मुळात हा शिक्षणाचा विषय आहे. नोकरीचा आहे. महाराष्ट्रात भूमीपुत्रांना नोकऱ्या, चांगलं शिक्षण मिळायला हवं. यात जात येते कुठे, ते ओबीसी असो किंवा मराठा, कोणत्याही जातीचा असेल तरी मुला-मुलींना चांगलं शिक्षण आणि रोजगार मिळायला हवं असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

Pooja Khedkar : बडतर्फ IAS पूजा खेडकर आता देणार यूपीएससीच्या निर्णयाला आव्हान; घेतला मोठा निर्णय!

महाराष्ट्रात सर्व गोष्टी आहेत त्यामुळे महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असंही राज ठाकरे म्हणाले. राज्यातील मुला-मुलींना चांगलं शिक्षण, रोजगार मिळायला हवा. यात जात कुठं येते? मला जातीतलं कळत नाही, माझ्याकडे याचं उत्तर नाही. राज्यात सर्व गोष्टी मुबलक आहेत त्यामुळे आरक्षणाची गरजच नाही. राज्यात किती शैक्षणिक संस्था आहेत, तिथे आरक्षण आहे का? किती जातींना मिळणार? किती नोकऱ्या मिळणार? हे आपण तपासणार आहे का? असे प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारले.

दरम्यान, मणिपूरमध्ये जे घडलं तशी परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा निर्माण होते का? अशी भीती वाटतं आहे असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी विधान केलं होते, त्याबाबत विचारला असता राज ठाकरेंनी पवारांवर निशाणा साधला. शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत नेमकं काही समजत नाही, असं राज ठाकरेंनी म्हंटल.

Kalyan Accident : भीषण! भीमाशंकरला निघाले, कल्याण-मुरबाड रस्त्यावर अर्टिगाची झाडाला जोरदार धडक, तिघांचा मृत्यू

 
Raj Thackeray
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...