75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

lok sabha

Lok Sabha Election Result 2024 : बीडची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर झाली? इथे कुठले फॅक्टर निकाल ठरवणार याची सगळ्यांना कल्पनाही आली. मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येणार, हे प्रामुख्याने जातीय समीकरण ठरवणार आहेत. 

Beed North Lok Sabha Election Result 2024 : पाच टप्पे आणि 48 मतदारसंघ! महाराष्ट्रात जवळपास सगळीकडे शांततेत मतदान पार पडलं. पण याला गालबोट लागलं ते बीड लोकसभा(Lok sabha) मतदारसंघात निवडणूक पार पडल्यानंतर बीडमधील एका गावात उफाळून आलेला जातीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पहिला आणि बीडची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर झाली? इथे कुठले फॅक्टर निकाल ठरवणार याची सगळ्यांना कल्पनाही आली. मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येणार, हे प्रामुख्याने जातीय समीकरण ठरवणार आहेत. 

बीड लोकसभा मतदारसंघात दोन वेळ खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत भाजपने पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवले. चेहरा बदलल्यामुळे या मतदारसंघातील समीकरणं अनुकूल होतील, असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात निवडणूक झाल्यानंतर बीडच्या निकालाने सगळ्यांचीच धडधड वाढवली.  नरेंद्र मोदींचा चेहरा आणि राष्ट्रीय मुद्द्यांना पुढे करत ही निवडणूक भाजपने लढवण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्येक मतदारसंघात स्थानिक मुद्दे जास्त वरचढ ठरले. त्यात बीड लोकसभा मतदारसंघात आधीपासूनच मराठा आरक्षण आंदोलनाची धग जाणवत होती. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपापल्या जमेच्या बाजू बघत उमेदवार निवडले, पण जातीय संघर्षानेच इथला प्रचार संपला.  पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत आहे. बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा… अशीच ही निवडणूक झाली. उमेदवार आणि प्रचार… अशी चौफेर ही निवडणूक जातीय समीकरणांभोवतीच फिरली. त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल उत्कंठावर्धक असणार आहे.

2019 मध्ये काय निकाल लागला –

प्रीतम मुंडे यांना 6 लाख 78 हजार 175 मते तर बजरंग सोनवणे यांना 5 लाख 9 हजार 108 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे 91  हजार 972 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात 36 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. 

राज्यात सर्वाधिक मतदान बीड जिल्ह्यात झाले –

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झालं. यात बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता सुमारे 70.92  टक्के मतदान  झाले. बीडमध्ये राज्यात सर्वाधिक 70.92 एवढ्या  मतदान झालं असल्याची नोंद समोर येते आहे. तिसऱ्या टप्प्यापर्यंत झालेल्या मतदानात उन्हामुळे राज्यात ठिकठिकाणी मतदानाचा टक्का घसरलेला असताना चवथ्या टप्यात मतदान करणाऱ्या बीडकरांनी मात्र उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानाला न जुमानता रेकॉर्ड ब्रेक 70.91टक्के  मतदान करून  आपलं वेगळेपण जपले आहे . सर्वाधिक बीडमध्ये 70.91टक्के तर नंदुरबार मधे 70.68टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत 4% पेक्षा मतदान वाढ झाल्यानंतर हे वाढलेलं मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात पडतं, त्यावर बीडचा खासदार कोण हे ठरणार आहे. बजरंग सोनवणे यांची तुतारी वाजणार की भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बीड  लोकसभेत पंकजा मुंडेचे कमळ पुन्हा फुलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

बीड लोकसभेत कोण कोणते आमदार ?

गेवराई – भाजप – लक्ष्मण पवार

माजलगाव – राष्ट्रवादी (अजित पवार)- प्रकाशदादा सोळुंके 

बीड – राष्ट्रवादी (शरद पवार) – संदीप क्षीरसागर

आष्टी – राष्ट्रवादी (अजित पवार)- बाळासाहेब अजबे 

केज – भाजप – नमिता मुंदडा

परळी – राष्ट्रवादी (अजित पवार)- धनंजय मुंडे 

मनोज जरांगे फॅक्टर निर्णायक – 

राज्यात मराठा आरक्षण आंदोलन काही काळ स्थगित झालेल असलं तरी त्याचा प्रभाव आणि धग बीड  जिल्ह्यात सुरुवातीपासून होती. तो प्रभाव लोकसभा निवडणुकीवर जाणवत असल्याचे चित्र होते . एकीकडे मराठा समाज या आंदोलनामुळे एकवटला असल्याचं चित्र आहे. याचाच परिणाम म्हणून भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांचा ताफा गावात आल्यानंतर मराठा आरक्षण समर्थकांनी घोषणा दिल्याचं व ताफा अडवल्याचे  चित्र काही गावात  पाहायला मिळाले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीदरम्यान केलेली वक्तव्ये मराठा समाज एकत्र करण्यास कारणीभूत ठरल्याचे ही चित्र होते. त्याचा फायदा बजरंग सोनवणे यांना झाला.

तर बीड जिल्ह्यात असणारा वंजारा आणि इतर ओबीसी समाजही मराठा  एकवटण्या च्या क्रियेला प्रतीक्रिया या न्यायाने एकवटल्याचे पहायला मिळाले. वंजारा, माळी,धनगर, बंजारा जाती समूह एकत्रित गुंफल्याचे व तो पंकजा मुंडेंच्या पाठीशी राहिल्याचे या निवडणुकीत दिसले. त्यामुळे जातीच ध्रुवीकरण हा महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत प्रकर्षाने यंदा जाणवलेला आहे .या जातीपातीच्या राजकारणात कोण मुसंडी मारतो हे येत्या काळात समोर येणार आहे.

बीडमध्ये 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान  झाले. यंदा  लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलेच तापले  .आरोप प्रत्यारोप  झाले. मंत्री धनंजय मुंडे यांनी तर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर सभेतून टीकेची झोड उठवली. विशेष म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आणि भाजपासाठी ही सभा अनुकूल ठरली. नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख असल्याने जिल्ह्याला भरभरून निधी त्या खासदार झाल्या तर आणू शकतील. त्यामुळे त्यांना निवडून देण्याचा आवाहन ते करत आहेत. मंत्री नितीन गडकरी यांनीही, पंकजाला निवडून द्या, पंतप्रधान मोदींसोबत मी जिल्ह्याच्या विकासाची गॅरंटी देतो, असे आवाहन बीडच्या जनतेला केले.

पंतप्रधान मोदी यांनी अंबाजोगाईत सभा घेऊन गोपीनाथ मुंडे यांची स्वप्नपूर्ती पंकजाला करायची आहे. त्यामुळे निवडून देण्याचे आवाहन केले. तर त्यांच्याविरोधात बजरंग सोनवणे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावलौकिकास पात्र ठरलेला वैद्यनाथ साखर कारखाना हे बहीण-भाऊ चालू शकले नाहीत. आश्वासन देऊन अजून रेल्वे बीडपर्यंत आली नाही . ऊसतोडणी कामगाराचे प्रश्न तसेच आहेत. विकास बीडपासून दूर आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे  अध्यक्ष  शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह बजरंग सोनवणे व अन्य महाविकास आघाडी नेत्यांनी करत सर्व सामान्य घरातील उमेदवार असलेल्या बजरंग सोनवणे यावेळी निवडून देण्याचे आवाहन केले.

Lok Sabha
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...