75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतकऱ्याने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे स्वतः शेतकऱ्यासह १५ ते २० म्हशींचे प्राण वाचले. मात्र तरीदेखील पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा पाण्यात तुटून पडलेल्या वीजतारेमुळे उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून मृत्यू झाला.

ही घटना कर्जत शहरातील लेंडी नदीवर असलेल्या समर्थ बंधाऱ्यात घडली. मात्र या दुर्घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शेतकरी सोपान बरबडे नेहमीप्रमाणे आपल्या म्हशी चारण्यासाठी समर्थ बंधारा परिसरामध्ये घेऊन गेले होते. तहान लागल्याने म्हशी बंधाऱ्यात जाऊ लागल्या. नेहमीप्रमाणे सर्व म्हशी एकापाठोपाठ पाण्यात जाऊ लागल्या.

मात्र पहिल्या गेलेल्या चार म्हशी पाण्यात उतरल्याबरोबर कोसळल्या आणि तडफडून काही क्षणात मृत्युमुखीही पडल्या. त्यामुळे काहीतरी गडबड आहे, हे लक्षात येताच बरबडे यांनी तत्काळ मागून पाण्याजवळ धावत जाऊन अन्य म्हशींना मागे हाकलले. त्यामुळे अन्य म्हशी पाण्यात गेल्या नाहीत.

या तळ्यात विजेचा प्रवाह उतरला असल्याचे शेतकरी बरबडे यांच्या लक्षात आले. यावेळी पाण्यापासून स्वतःला लांब ठेवल्यामुळे या शेतकऱ्याचा देखील जीव वाचला. परिसरातून जाणारी वीजवाहक तार तुटून तळ्यात पडली होती व त्याचा प्रवाह पाण्यामध्ये उतरल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ महावितरण कार्यालयाला फोन करून माहिती कळवली. यानंतर या परिसरातील विजेचा प्रवाह बंद करण्यात आला.

महावितरण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय शवविच्छेदन केले. अधिकाऱ्यांनी शेतकरी सोपान बरबडे यांनी कर्ज काढून या सर्व म्हशी खरेदी केल्या असून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Ahmednagar News
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...