75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटील यांनी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये आला आहे. या बैठकीत बोलताना लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजला महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे(Manoj Jarange) पाटील?

‘आपला विषय लोकसभेचा नाही तर राज्यातील आहे. आरक्षण देण्याचं काम राज्याच्या हातात आहे. कमीत कमी आठरा मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व आहे. पण आपला विषय केंद्रात नाही, राज्यात आहे. मग त्याचवेळेस समिकरण बदलू शकतं. आपण जर लोकसभेला एकाचवेळी इतके फॉर्म भरले तर समाज अडचणीत येऊ शकतो. मतदानाचं विभाजन होईल. त्याला एक पर्याय करा, अपक्ष म्हणून फक्त एकानेच एका जिल्ह्यात फाॅम भरा. मात्र तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे,’ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

‘पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, लोकसभेचा आपल्याला काहीही उपयोग नाहीये, आपलं आरक्षण तिथे नाहीये, तिथे आवाज जाऊन काहीही उपयोग नाही. याला दुसरा पर्याय आहे, आपण अर्ज न भरता मराठा समाजानं उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो बॉण्डवर लिहून घ्या सगे-सोयरेला पाठिंबा देणार का? तुमचं मत जर असं असेल अपक्ष उमेदवार उभा करायचा आणि मराठ्यांची शक्ति दाखवायची तर एक बदल करावा लागेल. पर्याय असा असेल की प्रत्येक जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार उभा करा. लढायचं तर पूर्ण शक्तिनं लढा अर्धवट नको असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...