75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

OTT

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्मवर कारवाई केली आहे. 18 ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आले आहेत.

आता बऱ्याच लोकांचा मनोरंजनासाठीचा कल ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्मकडे वाढला आहे. तुम्हीही ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण मोदी सरकारनं ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई केली आहे. 18 ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आले आहेत. 19 वेबसाइट्स, 10 ॲप्स, OTT प्लॅटफॉर्मचे 57 सोशल मीडिया हँडल देशभरात ब्लॉक केले गेले आहेत.

अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.यापूर्वी केंद्र सरकारने नेटफ्लिक्स, डिस्ने आणि इतर स्ट्रीमिंग सेवांना कोणताही कंटेट ऑनलाईन करण्यापूर्वी अश्लीलता आणि हिंसाचारासंबंधी कंटेन्टची पडताळणी करायला सांगितलं आहे. त्याचं स्वतंत्रपणे पुनरावलोकन करण्यास सांगितलं होतं. पण तसं न झाल्याने आता केंद्राने ओटीटी प्लॅटफॉर्मविरोधात हे कठोर पाऊल उचललं आहे.

कोणकोणते ओटीटी ब्लॉक केले गेले?

ड्रीम्स फिल्म्स, वूवी, येस्मा, अनकट अड्डा, ट्राय फ्लिक्स, एक्स प्राइम, निओन एक्स व्हिआयपी, बेशर्मास, हंटर्स, रॅबिट,एक्स्ट्रामूड,न्यूएफ्लिक्स, मूडएक्स,मोजफ्लिक्स,हॉट शॉट्स व्हिआयपी,फुगी,चिकूफ्लिक्स, प्राइम प्ले

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...