75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Vanraj Andekar

Vanraj Andekar : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पुण्यात हत्या करण्यात आली आहे. गणेशोत्सवाआधीच्या शेवटच्या रविवारी बाजारपेठांमध्ये गर्दी असतानाच नाना पेठेमध्ये वनराज आंदेकरवर गोळीबार करण्यात आला.

Vanraj Andekar : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पुण्यात हत्या करण्यात आली आहे. गणेशोत्सवाआधीच्या शेवटच्या रविवारी बाजारपेठांमध्ये गर्दी असतानाच नाना पेठेमध्ये वनराज आंदेकरवर गोळीबार करण्यात आला. रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास नाना पेठ परिसरामध्ये आंदेकरवर गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारानंतर आंदेकरवर कोयत्याने वारही करण्यात आले. आंदेकरला पाच गोळ्या लागल्यानंतर तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण आंदेकरला मृत घोषित करण्यात आलं.

पुणे पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वनराजचे वडील बंडू आंदेकर याच्यासह आंदेकर कुटुंबाचा टोळीशी संबंधित कारवायांचा कुप्रसिद्ध इतिहास आहे. नुकतेच बंडू आंदेकरसह इतर सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याआंतर्गत (मकोका) आरोप ठेवण्यात आले होतं, पण याप्रकरणी जामीन मिळाला होता.

वनराज आंदेकरवर हल्ला करणाऱ्यांमध्ये गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम अशी संशयितांची नावं आहे. पोलीस सध्या मारेकऱ्यांच्या शोधात आहेत.

घरगुती वादातून बंडू आंदेकरचा जावई गणेश कोमकर याने फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गणेश कोमकर याने काही वर्षांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावर ऍसिड हल्ला केला होता.

उदयकांत आंदेकरनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं, त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती, वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं, पण घरगुती वादातून आंदेकरची हत्या केल्याचं बोललं जात आहे.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...