75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

मेट्रो

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावं बदलणार आहेत.

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावं बदलणार आहेत. त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून, याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ज्या मेट्रो स्थानकांची नावं बदलण्यात येणार आहेत त्यामध्ये बुधवार पेठ, मंगळवार पेठ आणि नाशिक फाटा या स्थानकांचा समावेश आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे, त्यामुळे आता लवकरच या मेट्रो स्थानकांची नावं बदलणार आहेत.

पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावं बदलणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून, याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ज्या मेट्रो स्थानकांची नावं बदलण्यात येणार आहेत, त्यामध्ये बुधवार पेठ, मंगळवार पेठ आणि नाशिक फाटा या स्थानकांचा समावेश आहे. बुधवार पेठ स्थानकाचं नाव कसबा पेठ स्थानक, मंगळवार पेठ स्थानकाचं नाव आरटीओ स्थानक आणि नाशिक फाटा स्थानकाचं नाव कासारवाडी असं करण्यात येणार आहे.  तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

सिव्हिल कोर्ट स्थानकाचे नाव शिवाजीनगर जिल्हा न्यायालय करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यानंतर आता बुधवार पेठ, मंगळवार पेठ आणि नाशिक फाटा या स्थानकाचं नाव देखील बदलण्यात येणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईतील काही रेल्वे स्टेशनची नावं देखील बदलण्यात आली आहेत.

मेट्रो
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...