Pooja Khedkar : युपीएससीनं पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करत त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती, या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
Pooja Khedkar : वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर यांचे विविध कारनामे समोर आल्यानं त्यांच्यावर यूपीएससीनं कारवाई केली होती. यूपीएससीनं पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करत त्यांना शो कॉज नोटीस बजावली होती आता पूजा खेडकर यांनी याप्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पूजा खेडकर यांचे विविध कारनामे समोर आल्यानंतर याची गंभीर दखल यूपीएससीकडून घेण्यात आली होती. पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. तसेच त्यांना परीक्षा देण्यास देखील बंदी घालण्यात आली होती. यूपीएससीकडून पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. आता या विरोधात पूजा खेडकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. पूजा खेडकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दरम्यान पूजा खेडकर यांनी तब्बल सात वेळा आपल्या नावात फेरफार करून यूपीएससीची परीक्षा दिल्याचं समोर आलं आहे. इंग्रजी भाषेमधून नाव देताना पूजा खेडकर यांनी अनेक वेळा त्यांच्या स्वतःच्या नावाचे स्पेलिंग बदलून हा सगळा प्रकार केल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासातून आता समोर आले आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेसाठी त्यांचं नाव लिहिताना सातवेळा फेरफार केल्याचं उघडकीस आलं आहे. इतकंच नव्हे तर पूजा खेडकर यांनी वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचं समोर आला आहे.