पुणे Porsche Car अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे, विशाल अग्रवालच्या हॉटेलवर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यात एक भीषण अपघात घडला होता. एका भरधाव Porsche Carनं दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत या अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही गाडी एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. या प्रकरणात आता अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा आणि आई कोठडीत आहेत. तर अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
आभाळातून कोसळला ‘मृत्यू’; पावसाला सुरुवात होताच दोघांनी गमावला जीव..
विशाल पाटील यांचं महाबळेश्वरमध्ये MPG क्लब नावाचं एक अनधिकृत हॉटेल असल्याचं समोर आलं होतं. महाबळेश्वरमध्ये सरकारी जागेत हे हॉटल उभारण्यात आल्याचं समोर आल्यानंतर आता या हॉटेलवर प्रशासनाकडून हातोडा चालवण्यात आला आहे. हे हॉटेल जमीनदोस्त करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानं प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
विशाल अग्रवालच्या हॉटेलवर बुलडोझर#porchecar #porchecaraccident #accident #vishalAgrawal pic.twitter.com/TbO1Fcu6Bu
— Aamhi Newaskar News (@AamhiNewaskar) June 8, 2024
विशाल अग्रवालचं महाबळेश्वरमध्ये पंचतकारांकित हॉटेल आहे. हे हॉटेल सरकारी जागेत बांधण्यात आलं आहे. नगरपालिकेत या हॉटेलविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावर कारवाई केली गेली नव्हती. एमपीजी क्लब हे विशाल अग्रवाल याचं हॉटेल आहे. सरकारी जागेवर हे हॉटेल बांधलं आहे. सरकारी जागा असताना ठराविक बांधकामाला परवानगी असताना हॉटेल उभारलं . याविरोधात नगरपालिकेत तक्रारी दाखल झाल्या, त्यानंतर अखेर या हॉटेवर आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानं प्रशासनाकडून या हॉटेलवर हातोडा चालवण्यात आला आहे.