Maharashtra Loksabha Exit Poll : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर यायला सुरूवात झाली आहे. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल येणार असले तरी एक्झिट पोलमध्ये चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.
Maharashtra Loksabha Exit Poll : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल येणार असले तरी एक्झिट पोलमध्ये चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या निकालांकडे लागलं आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात एक्झिट पोलचे धक्कादायक आकडे आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या 11 जागांपैकी महायुतीला 4 ते 6 तर महाविकास आघाडीलाही 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या लढती
पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप) विरुद्ध रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
शिरूर- शिवाजीराव आढळराव पाटील (राष्ट्रवादी) विरुद्ध अमोल कोल्हे, (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
अहमदनगर दक्षिण- सुजय विखे पाटील (भाजप) विरुद्ध निलेश लंके ( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
माढा- रणजीतसिंह निंबाळकर (भाजप) विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
बारामती- सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
मावळ- श्रीरंग बारणे (शिवसेना) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील (शिवसेना उ.बा.ठा.)
कोल्हापूर- संजय मंडलिक (शिवसेना) विरुद्ध शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस)
सांगली- संजय काका-पाटील (भाजप) विरुद्ध चंद्रहार पाटील (शिवसेना उ.बा.ठा.)
सोलापूर- राम सातपुते (भाजप) विरुद्ध प्रणिती शिंदे (काँग्रेस)
सातारा- उदयनराजे भोसले (भाजप) विरुद्ध शशिकांत शिंदे, (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
हातकणंगले- धैर्यशील माने (शिवसेना) विरुद्ध राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) विरुद्ध सत्यजीत पाटील (शिवसेना उबाठा)
महाराष्ट्रात महायुतीची सरशी
एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 20 ते 22 जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष राहील, तर शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागा मिळू शकतात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1 जागा मिळेल, असा अंदाज आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीला 32 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा मिळू शकतात. यात काँग्रेसला 6 ते 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 7 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 3 ते 6 जागा मिळतील, असा अंदाज आहे.