राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने (Sharad Pawar) बीड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. अजितदादा गटात असलेले बजरंग सोनवणे यांना पक्षात घेऊन पक्षाने त्यांना दुसऱ्यांदा लोकसभेचं तिकीट दिलं आहे. यापूर्वी या जागेवर शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती. मेटे यांना तिकीट न मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. यावर आता खुद्ध शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पात याचं उत्तर दिलं आहे. पवार यांनी आज पुण्यातील पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर मनमोकळेपणाने मत व्यक्त केलं.
ज्योती मेटेंना तिकीट का दिलं नाही?
बीडमध्ये बजरंग सोनवणे यांनी शरद पवार(Sharad Pawar) यांना उमेदवारी दिली. यापूर्वी शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे यांनी उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांचं तिकीट कापल्याची चर्चा होती. यावर शरद पवार यांना विचारले असता, ज्योती मेटे ज्यादिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचं कळालं त्याच दिवशी पक्षाने त्यांच्या उमेदवारीचा विचार सोडून दिला. तसंच त्या अजून आमच्या पक्षातही आल्या नव्हत्या. त्यामुळे बीडमधून त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती शरद पवारांनी अनौपचारिक चर्चेत दिली.
38 वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधातून निर्घृण खून; डोके दगडाने ठेचले..
ज्योती मेटे अपक्ष निवडणूक लढणार?
महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. अशात शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे अपक्ष उमेदवारी लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांशी भेट घेऊन लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भातील अधिकृत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं ज्योती मेटे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. शरद पवार गटाकडून ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर शरद पवारांसोबत त्यांच्या बैठकाही झाल्या होत्या. मात्र, तिकीट मिळालं नाही. पण, मी लोकसभा निवडणूक लढावी ही लोकांची आणि आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं ज्योती मेटे यांनी सांगितलं. असं झाल्यास बीडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
मातब्बर नेत्या पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी शरद पवार(Sharad Pawar) यांनी मराठा चेहरा म्हणून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहिर केली आहे..तरी देखील मतविभाजन होवून पंकजा मुंडे निवडणुकीत जय प्राप्त करणार की शरद पवारांची मराठा कार्ड खेळी काम करणार हे पहायला निकालाची वाट पाहावी लागेल. मात्र ज्योती मेटे यांच्या निर्णयावर बीड लोकसभेच्या निवडणुकीचे वेगळे असेल.
प्रचाराला आलेल्या भाजप उमेदवाराला गावकऱ्यांना विचारला जाब, सभा न घेताच परतले नेते..