75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

खून

पुणे जिल्ह्यातील (Pune District) इंदापूर शहराजवळ झालेल्या गोळीबाराची (Firing) घटना ताजी असतानाच आता पुण्यात (Pune) आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. क्रिकेटवरून (Cricket) झालेल्या वादातून पुण्यात गोळीबार करण्यात आल्याची घघटना समोर येत आहे. पुण्यातील कात्रज भागात हा सर्व प्रकार घडला असून, सुदैवानं गोळीबारात कोणी जखमी नाही. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti University Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज भागात राहत असलेल्या दोन गटात क्रिकेटचा सामना मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, मॅच सुरु असतानाच क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. हाच वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटातील तरुण पुन्हा बुधवारी भेटले. यावेळी एका गटात एक रेकॉर्ड वरचा गुन्हेगार होता. तर, वाद मिटवण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये पुन्हा वाद झाले. दरम्यान, यावेळी एका तरुणाने समोरच्या गटात असणाऱ्या तरुणावर बंदूक ताणली आणि गोळी चालवली. मात्र, ती गोळी त्याला लागली नाही. गोळीबार होताच परिसरात पळापळ झाली आणि यावेळी दोन तरुण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

क्रिकेट सामना सरू असताना झालेला वाद मिटवण्यासाठी दोन्ही गट भेटीला आले असतानाच पुन्हा वाद झाला. त्यामुळे दोन्ही गटातील तरुण आक्रमक झाले. याचवेळी एकाने थेट पिस्तुल काढत समोर आलेल्या तरुणाच्या दिशने पिस्तुल करत थेट गोळीबार केला. मात्र, या तरुणाने स्वतःचा बचाव केल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आणि तो थोडक्यात बचावला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

क्रिकेट
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...