75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

शिवसेना

एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिने शिवसेना खासदाराचे नाव घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. संबंधित खासदार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आहेत.

एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिने शिवसेना खासदाराचे नाव घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. संबंधित खासदार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आहेत. शिवसेना खासदाराचे नाव घेऊन एका महिलेने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव या महिलेने व्हिडिओमध्ये घेतलं आहे. जानेफळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांच नावही महिलेने व्हिडिओमध्ये घेतलं आहे. ठाणेदार कारवाई करत नसल्याचा व्हिडिओमध्ये आरोप करण्यात आला आहे.

आरोप करणारी महिला काल सकाळपासून गायब असून जानेफळ पोलिस महिलेचा शोध घेत आहेत. व्हिडिओमध्ये महिलेने तिचं नाव सरस्वती राठोड सांगितलं आहे. सदर महिला मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथील राहणारी आहे. बाहेरगावच्या काही लोकांनी घर तोडून साहित्य चोरुन नेले, अशी तक्रार महिलेने केली. मात्र पोलीस आणि खासदार जाधव यांनी न्याय दिला नाही. उलट खासदार जाधव यांनी आपला अपमान केल्याचं तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. महिलेने केलेले आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी फेटाळून लावले आहेत. प्रतापराव जाधव हे बुलढाणा जिल्ह्यातील दिग्गज नेते आहेत. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...