75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Weather Update : डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारा आणि विजाच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

Weather Update : राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट घोंगावत आहे. गोल्या चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या गारपिटीचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे 12 एप्रिल ते 18 एप्रिलपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, सोबतच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.

पुण्यातील शिक्षिकेचं भयानक कृत्य; विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण, कचऱ्याच्या डब्यात कोबलं तोंड

डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारा आणि विजाच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसाचा स्वरुप सर्वदूर असं जरी नसलं तरी मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे हवामान विभागाकडून (imd) देखील हायअलर्ट देण्यात आला आहे, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपिटीचा देखील अंदाज आहे.

आज हवामान विभागाकडून विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे लातूर, बीड, जालना, सोलापूर, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर आणि इतर अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

शरद पवारांचा भाजपला आणखी एक धक्का; बड्या नेत्यानं दिला राजीनामा, आता लढवणार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...