75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

गोळीबार

काही दिवसांपूर्वीच एमआयएमच्या माजी महापौरांवर गोळीबार करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता माजी नगरसेवकावर तलवारीनं हल्ला करण्यात आला आहे.

मालेगावात गुन्हेगारीच्या घटनांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच एमआयएमच्या माजी महापौरांवर गोळीबार करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलावर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं मालेगाव पुन्हा एकदा हादरलं आहे. अजीज लल्लू असं या हल्ला झालेल्या माजी नगरसेवकांचं नाव आहे, या हल्ल्यात ते आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, माजी महापौरावर गोळीबार करून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असताना, रात्री एका माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलावर तलवारीने कारण्यात आलेल्या हल्ल्यामुळे मालेगाव पुन्हा हादरलं आहे. अजीज लल्लू असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे, ते आणि त्यांचा मुलगा नमाज पठण करून घरी जात असताना हजारखोली भागातील मदिना चौक येथे या दोघांवार दोन ते तीन अज्ञात लोकांनी तलवारीने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणा आणली. जुन्या भांडणाची कुरापत काढून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वारंवार घडत असलेल्या हल्ल्याच्या घटनांमुळे मालेगावात चाललं तरी काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

 

गोळीबार
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...