75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्री सुडे या तरुणीचे अपहऱण करून तिचा खून करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडालीय. तरुणीचे तिच्याच मित्रांनी अपहरण केले. अपहरणानंतर काही तासातच खून केला गेला. तरुणांनी तिचा खून करण्यासाठी आधीच कट रचला होता आणि त्यासाठी १०० किमी अंतरावर खड्डासुद्धा खोदून ठेवला होता. पोलीस तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. तरुणीचा 30 मार्च रोजी खून केला. त्याआधी एक दिवस तरुणांनी १०० किमी जाऊन खड्डा खोदून ठेवला.

खंडणी उकळण्यासाठी तरुणीचं अपहरण करायचं ठरलं, पण तिला जिवंत सोडायचं नाही असं ठरवून तिला जेवायला जाऊ असं सांगून तरुणांनी नेलं होतं. तिचा तोंडू ताबून खून केला गेला. त्यानंतर मृतदेह ओळखू नये म्हणून पेट्रोल टाकून जाळला आणि खड्ड्यात पुरला अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

Accident : समोर सळईने भरलेला ट्रक अन् बुलेट घेऊन तो जात होता, मागून कंटेनर येऊन आदळला,पाच वाहनांचा झालेला विचित्र अपघात.. video सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

पोलिसांनी या प्रकरणी शिवम फुलवळे, सुरेश इंदोरे आणि सागर जाधव यांना अटक केलीय. शिवम फुलवळे हा मुख्य सूत्रधार असून तो भाग्यश्रीसोबत इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. तर भाग्यश्री सुडे ही मूळची लातूर जिल्ह्यातली आहे. वडील गावचे माजी सरपंच असून घरची परिस्थिती सधन आहे. इंजिनिअरिंगसाठी ती पुण्यात आली होती. इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत होती.

भाग्यश्रीचा खून करणारा आरोपी शिवमचे वडील शिक्षक आहेत. भाग्यश्रीला जेवायला जायचंय असं सांगून त्याने बोलावलं होतं. फिनिक्स मॉलमधून तिला शिवमने सोबत घेतलं. त्याआधी शिवमने झूम कार वरून एक कार भाड्याने घेतली. त्यानंतर जेवायला जायचं सांगून कारमधून तिचे अपहरण केले. कारमध्येच तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातल्या कामरगाव इथं कार नेली आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

मर्चंट नेव्हीत ड्युटीवर असताना बेपत्ता असलेल्या प्रणव सोबत नेमकं काय घडलं?

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...