75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Shilphata Rape Case

Shilphata Rape Case : ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. 

Shilphata Rape Case : शिळफाटा येथील महिलेवर सामूहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा खटला (Shilphata Rape Case) फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पोलिसांना दिल्या आहेत. 

शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा जलदगतीने तपास करण्यात येणार आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ  उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या.

ही अत्यंत गंभीर घटना असून याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलीसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही घटना शिळफाटा, ठाणे येथे घडली असून तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच महिलेच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरुन नवी मुंबई पोलीसांकडे 498 ए कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने आणि जलदगतीने करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

महिलेवर सामूहिक अत्याचार आणि तिची हत्या करणाऱ्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ  उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या आहेत. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. 

Shilphata Rape Case
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...