75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Sharad Pawar

Sharad Pawar :  शरद पवार यांच्या एका डावामुळे यावेळी बीड लोकसभा निवडणुकीत चुरस वाढली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवारांनी ज्योती मेटे यांना उतरवण्याची जोरदार तयारी चालवली आहे. खरंच असं झालं तर बीडमध्ये ओबीसी विरूद्ध मराठा अशी थेट लढत होऊ शकते. ? बीड लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत गोपिनाथ मुंडे यांचा गड राहिला आहे. मात्र, यावेळी समीकरणे बदलल्याने पंकजा मुंडे यांच्यासमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे.

बीडात पवार पुन्हा ‘मराठा कार्ड’ खेळणार?
बीड लोकसभा हा तसा भाजपच्या मुंडे कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. पण तिथं ओबीसी विरूद्ध मराठा अशी लढत झाली तर भाजपची जागा धोक्यात जाऊ शकते, हे पवारांना चांगलंच ठाऊक आहे. कदाचित म्हणूनच पवारांनी यावेळी तिथून दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी चालवली आहे. तसेच त्यांना सपोर्ट म्हणून बंजरंग सोनवणे यांनाही पक्षात सामील करून घेतलंय. सोनवणे हे माजलगाव विधानसभा तर ज्योती मेटे या मविआतर्फे बीड लोकसभेसाठी मैदानात उतरू शकतात.

बीड लोकसभेतील जातनिहाय मतदारांची संख्या

  • एकूण मतदार – 21 लाख
  • मराठा मतदार – साडेसात लाख
  • ओबीसी मतदार – सहा लाख..
  • दलित मतदार – 2 लाख
  • मुस्लिम मतदार- 3.5 लाख
  • इतर – 2 लाख

बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा मोठा प्रभाव असल्याने ज्योती मेटे यांना त्याचा मोठा राजकीय लाभ मिळू शकतो. कारण दिवंगत विनायक मेटे यांचं मराठा आरक्षण लढ्यात मोठं योगदान राहिलं आहे. म्हणूनच जर समजा ज्योती मेटे या मविआतर्फे उभा राहिल्या तर पंकजा मुंडे यांना जोरदार फाईट देऊ शकतात, असं स्थानिक पत्रकारांना वाटतं.

बीडमध्ये मुंडे परिवार हा आजवर एकगठ्ठा ओबीसी वोट बँकेच्या जीवावर राजकीय प्राबल्य राखत आलाय. पण तिथं समोरुन मराठा उमेदवार दिला गेला तर लागलीच मतांचं ध्रुवीकरण होऊन फाईट रंगतदार बनते. पण या दुरंगी लढतीत मुस्लीम आणि दलित मतदार जिकडे झुकतो त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो. पण यंदा बीडात जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा फॅक्टर पुन्हा प्रभावशाली बनू पाहतोय. अशातच विनायक मेटे यांच्या अकाली अपघाताने निर्माण झालेली सहानुभूती ज्योती मेटे यांना मोठी फलदायी ठरू शकते. म्हणूनच यावेळीही बीडची लढत चर्चेत राहणार हे नक्की.

Sharad Pawar
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...