Maharashtra Rain : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात (Dam Water) देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातच आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात (Marathwada) आणि झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल तेवढी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील सरकारनं आम्हाला मदत करावी अशी मागणी केली आहे.