Rain Alert in Maharashtra : आजही राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Rain Alert in Maharashtra : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार असून या भागातील नागरिकांनी विनाकारण कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावं किंवा घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी
आज राज्यातील 9 जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा(Rain Alert) देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
रायगड आणि सातारा या जिल्ह्यांत आजही अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. साताऱ्यात घाट माथ्यावर अतिमुसळधार तर इतर भागात मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
Crime News : ‘माझी नाही झालीस तर…’, एकतर्फी प्रेमातून तरूणीला ब्लेडने वार करण्याची धमकी
पुण्यात आजही पावसाचा इशारा(Rain Alert) देण्यात आला आहे. जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून घाट माथ्यावर अतिमुसळधार तर इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुण्याशिवाय पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सातही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईतील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईत कमाल 30°C तर किमान 21°C तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Crime News : चार बहिणींनी भावाच्या गर्लफ्रेंडला संपवलं, भर रस्त्यात दगडाने ठेचून मारलं