75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

pune rain

Pune Rain : पिंपरी चिंचवडमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. पवना आणि मुळा नदी लगतच्या अनेक रहिवाशांचे आधीचे स्थलांतर करण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आणि पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने या एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे.

Pune Rain : पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात वाढत आहे. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने गेल्या आठवड्यातील परिस्थिती उद्भवू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे पवना आणि मुळा नदी काठच्या लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. पवना आणि मुळा नदी लगतच्या अनेक रहिवाशांचे आधीचे स्थलांतर करण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आणि पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने या एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. सुमारे शेकडो कुटुंबांचे स्थलांतर यावेळी करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांसाठी 3 वेळेचे जेवण तसेच राहण्यासाठी, झोपण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

Raj Thackeray On Reservation : “उद्या माझ्या हातात राज्य आलं तर…”, आरक्षणावरून राज ठाकरेंनी पुन्हा स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी जे बोललोय…”

नागरिकांनी काय म्हटले –

स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने चिखल झाला असल्याने गेल्या 10 दिवसांपासून ते सर्व घरापासून लांब असल्याचे त्यांनी म्हटले. अनेक महिलांकडे लहान लेकरे असल्याने आम्ही किती दिवस असं बाहेर राहायचं? असा सवाल करण्यात येत आहे. दरवेळी, पावसाच्या दरम्यान आम्हाला स्थलांतरीत करण्यात येते. त्याऐवजी आमच्या घराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, जेणेकरून पूरपरीस्थितीत आम्हाला कुटुंबावर अशा स्वरूपाचे संकट ओढवणार नाही तसेच आमच्या मुलाबाळांचे हाल देखील होणारं नाही, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अचानक आलेल्या पुरामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो कुटुंब विस्थापित झाली आहेत. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या 10 ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या विषयीची सर्व खबरदारी प्रशासनाने घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोठी बातमी! नागपूरमध्ये सिमेंट वीट कारखान्यात भीषण स्फोट

Pune Rain
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...