75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

manoj jarange

Manoj Jarange Patil : या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्यानं मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय.

Manoj Jarange Patil : नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी पुणे न्यायालयानं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी मनोज जरांगे- पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्यानं मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. 2013 मध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाट्य प्रयोगाचं आयोजन केलं होतं. त्या नाट्य प्रयोगाची ठरलेली रक्कम न दिल्याचा आरोप नाट्यनिर्मात्यानं केला होता.

नेमकं काय आहे प्रकरण
2013 मध्ये पुण्यातील कोथरूड परिसरात जरांगे पाटील यांनी नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे दिले नाहीत, असा आरोप पीडित व्यक्तीनं केला. या प्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार कोथरूड पोलिसात 2013 मध्ये दाखल करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर जरांगे यांच्या पुणे सत्र न्यायालयामध्ये खटला चालू होता. या दरम्यान झालेल्या सुनावणीला मनोज जरांगे पाटील हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावला होता.

Manoj Jarange
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...