75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

बीडमधून(Beed) मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अशोक हिंगे यांना बीडमधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

Beed

लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. बीडमधून(Beed) मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अशोक हिंगे यांना बीडमधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. अशोक हिंगे यांच्या रुपानं  कुणबी मराठा चेहरा प्रकाश आंबेडकर यांनी बीड लोकसभेच्या रिंगणात उतरवला आहे. बीडच्या(Beed) उमेदवारी संदर्भात वंचितकडून पत्र जारी करण्यात आलं आहे. अशोक हिंगे यांनी मराठा क्रांती मोर्चामध्ये देखील समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

अमेरिकेत नोकरीला गेलेला पुण्याचा तरुण बेपत्ता, कंपनीने केला मेल; पालक हादरले..

वंचित बहुजन आघाडीकडून बीडमध्ये(Beed) अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महायुतीकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीड लोकसभेच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बजरंग सोनवणे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे आता अशोक हिंगे यांच्यासमोर बीडमध्ये बजरंग सोनवणे आणि पकंजा मुंडे यांचं मोठं आव्हान अणार आहे.

दरम्यान बीडमध्ये यावेळी लोकसभेसाठी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी अशोक हिंगे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे हे निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. दरम्यान ज्योती मेटे या देखील बीडमधून महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छूक होत्या. मात्र महाविकास आघाडीकडून सोनवणे यांना तिकीट देण्यात आल्यानं आता ज्योती मेटे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यावेळी बीडमध्ये(Beed) चौरंगी लढत होऊ शकते.

नाशिकमध्ये भीषण अपघात; ट्रकनं दुचाकीला उडवलं, एकाचा मृत्यू..

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...