75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होत आहे. एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहे. आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं. पक्ष प्रवेश कधी होणार हे मी सांगू शकत नाही, मला दिल्लीतून निरोप आला की पक्ष प्रवेश करणार, असं एकनाथ खडसे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान नेटवर्क18ला दिलेल्या खास मुलाखतीत राजनाथ सिंह यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं होतं. खडसेंना आम्ही बोलावलं नाही ते स्वतःहूनच भाजपकडे आलेत, देशाच्या विकासासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी ते भाजपमध्ये येत असावेत असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

मागच्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये परत येतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. काहीच दिवसांपूर्वी एकनाथ खडसे दिल्लीला जाऊन आले त्यानंतर या चर्चांनी आणखी जोर धरला. दिल्लीहून परतल्यानंतर एकनाथ खडसेंनी सूचक विधान केलं होतं.

असा काही निर्णय एक दिवसात होत नसतो, कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होत असतात. अशी कोणतीही प्रक्रिया मी आतापर्यंत केलेली नाही, त्यामुळे आता या सर्व प्रश्नांना मला पूर्णविराम द्यावासा वाटतो. जेव्हा अशा संदर्भातला विषय येईल तेव्हा मी त्याबद्दलची माहिती तुम्हा सर्वांना देईन’, असं खडसे म्हणाले होते.

‘माझ्या एका केसची सुप्रीम कोर्टात तारीख असल्यामुळे मी दिल्लीला गेलो होतो. दिल्लीला गेलो की अनेकांशी भेटीगाठी होत असतात, या भेटीगाठी नेहमीच होत असतात, मात्र यावेळी दिल्लीला त्या भेटी होऊ शकल्या नव्हत्या. मला जर भाजपमध्ये यायचं असेल तर माझे वरिष्ठ पातळीवर मोदी, शहा, नड्डा यांच्याशी थेट संबंध आहेत,’ असं एकनाथ खडसेंनी थेट सांगितलं होतं.

एकनाथ खडसे
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...