Political news : महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मुंडे बहीण भावावर जहरी टीका केली आहे. निष्क्रिय खासदारामुळे विकास निधी परत गेला. तर, वैद्यनाथ कारखाना फुकटात मिळाला म्हणून मुंडे भगिनींनी बंद पाडला, असं म्हणत त्यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांनाही टोला लगावला.
Political news : महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मुंडे बहीण भावावर जहरी टीका केली आहे. निष्क्रिय खासदारामुळे विकास निधी परत गेला. तर, वैद्यनाथ कारखाना फुकटात मिळाला म्हणून मुंडे भगिनींनी बंद पाडला, असं म्हणत त्यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांनाही टोला लगावला. फुकट मिळालेला वैद्यनाथ कारखाना तो देखील चालवता आला नाही, म्हणून तो बंद पडला, असं ते म्हणाले.
निष्क्रिय खासदारामुळे निधी परत गेला असल्याचा आरोप त्यांनी केला. पंधरा वर्षात भाजपच्या खासदारामुळे जिल्ह्याचा विकास झाला नसल्याचा घणाघाती आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. बीड जिल्ह्याच्या परळी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या बीड लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचार बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना बजरंग सोनवणे यांनी मुंडे बहीण भावावर निशाणा साधला.
Crime News : अलिबागमध्ये दोन चिमुकल्यांचा झोपेत मृत्यू, तपासात आईच निघाली मारेकरी, तपासात हादरवणारं कारण समोर..
मागच्या तीन टर्ममध्ये बीड जिल्ह्याला भाजपचा खासदार दिला. मात्र विकास किती झाला? असा सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला. तर खासदारांनी बीड जिल्ह्यात काही कामं केली नाही, म्हणून आज ही अवस्था असल्याचं म्हणत त्यांनी नाव न घेता प्रितम मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले, कोणीतरी म्हटलं, की बीड जिल्ह्यात रस्त्याचं जाळं झालं आहे. मात्र मी म्हणतो, हे आले मात्र सर्वच रस्ते अपूर्ण आहेत. कामं बाकी आहेत. त्यामुळे हजारो लोकांचे अपघात झाले, याला जबाबदार निष्क्रिय खासदार आहेत
आशिया खंडातील पहिला साखर कारखाना म्हणून वैद्यनाथ कारखान्याची ओळख होती. तर इथेनॉलचा पहिला कारखाना म्हणून देखील त्याची ओळख होती. मात्र आता त्याची काय अवस्था आहे. तो बंद पडला. ज्यांना सर्वकाही फुकट मिळालं, त्यांना काय माहीत, असं म्हणत त्यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली.
इंजिनिअर तरुणीच्या खून प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; आधीच खोदला खड्डा, जेवायला जायचं सांगून नेलं अन्…