लोकसभा निवडणुकीत मनसेचा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला पाठिंबा असेल पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच हा पाठिंबा देत असल्याचंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेचा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला पाठिंबा असेल पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच हा पाठिंबा देत असल्याचंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. लोकसभा लढणार नसलो तरी विधानसभेच्या तयारीला लागा, असं राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत.
‘या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. जर त्या पूर्ण झाल्या नाहीतर राज ठाकरे आहे. जर खंबीर नेतृत्व असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही, भाजप, शिवसेना युतीला नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. असं मी त्यांना सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, पुढचा विचार पुढे, जोरदार कामाला लागा. अजूनही जर समोरच्या लोकांची बकबक झाली तर दार खिडक्या माझ्या मोकळ्या आहे’, असं राज ठाकरे म्हणाले.
Political news : …म्हणून एकीने कारखाना बंद पाडला, तर दुसरीमुळे विकास निधी परत गेला; बजरंग सोनावणेंची मुंडे भगिनींवर टीका..
‘त्यावेळी टोकाचा विरोध केला, ज्यावेळेस 370 कलम रद्द झालं त्यावेळी मी अभिनंदन केलं आहे. स्वागत केलं आहे. NRC च्या बाजूने मोर्चा काढला आहे. पण त्यावेळी व्यक्तिगत कोणतीही टीका नव्हती. ज्या प्रकार उद्धव ठाकरे आणि संजय राऊत टीका करत आहे, त्याप्रकारे मी कधी बोलत नाही. मला मुख्यमंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी विरोध केला नाही. मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला. आज हे लोक बोलत आहे, मग त्यावेळी खिश्यातले राजीनामे का काढले नाही. त्यावेळी सत्तेचा मलिदा चाटत होते. आज हे लोक बोलत आहे, तुमचा पक्ष फुटला, तुमच्या हातातून सत्ता गेली म्हणून तुम्ही बोलत आहात’, असा निशाणा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर साधला.
‘राज ठाकरे शिंदेंचे सेनेचे प्रमुख होईल, अशी बातमी आली. मला जर व्हायचं असतं तर मी तेव्हाच झालो असतो. त्यावेळी. जवळपास 32 आमदार, 6 ते 7 खासदार आपण एकत्र बाहेर पडू आणि माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला. त्यावेळी इकडे बांधणी सुरू झाली. त्यांना वाटलं मी काँग्रेस सारखं सामील होईल. मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही. उद्या जर मी काही पाऊल उचललं तर स्वत: चा राजकीय पक्ष काढणार आहे. कुणाच्या हाताखाली काम करणार नाही’, असं राज ठाकरे म्हणाले.
‘ही गोष्ट मी मनाशी पक्का केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरी एकाला संधी दिली. त्याला समजलंच नाही. जाऊ तो झाला भुतकाळ, अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेऊ नका, मी कोणत्याही सेनेचा प्रमुख होणार नाही, मी जे अपत्य जन्माला घातलं आहे, त्याचाच प्रमुख राहणार आहे. तुमच्या विश्वासावर 18 वर्ष झाली आहे. अशी गोष्ट माझ्या मनाला शिवत नाही’, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
Crime News : अलिबागमध्ये दोन चिमुकल्यांचा झोपेत मृत्यू, तपासात आईच निघाली मारेकरी, तपासात हादरवणारं कारण समोर..