75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

 सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सातारा येथे आज महायुतीचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमात एक मोठी घटना आज सातारकरांना पाहायला मिळाली. सातारा म्हटलं की खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील राजकीय वैर सर्वांना माहीत आहे. मात्र, आज दोन्ही राजेंमध्ये अखेर मनोमिलन झालं. हे मनोमिलन निवडणुकीपर्यंत नसून कायम राहणार असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केलं. यावेळी मेळाव्यात उदयनराजेंनी सातारकरांना भावनिक साद घातली.

उदयनराजेंचे सातारकरांना भावनिक साद
महायुतीचा मेळावा साताऱ्यातील शेंद्र या ठिकाणी होत असुन या मेळाव्यात उदयनराजे यांनी मनोमिलनावर भाष्य केलं आहे. जेव्हा तुमच्या निवडणुका येतात तेव्हा एकत्र येता ही भावना मनात येणं योग्य आहे. मात्र, आम्हाला अडचणी होत्या. कार्यकर्ते जपत असताना प्रत्येकाची पाठराखण करावी लागते. मात्र, आता हात जोडुन विनंती करतो हे मनोमिलन कायम स्वरुपी ठेवायचं असुन वैयक्तिक हेवेदावे बाजुला ठेवुन निर्धार आपल्याला करायचा आहे.

उदयनराजे भोसले किंवा शिवेंद्रसिंहराजे यांना निवडुन आणा हा संकुचित विचार झाला. जिल्ह्याला गतवैभव आणायचं असेल तर एकत्र आलं पाहिजे, असं मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं. हे मनोमिलन फक्त खासदारकी किंवा आमदारकीसाठी नसुन सगळ्या निवडणुकांसाठी असेल असं उदयनराजे भोसले म्हणाले. यामुळं आता साताऱ्यात दोन्ही राजेंच जुळल्याचं पाहायला मिळालं.

इंजिनिअर तरुणीच्या खून प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; आधीच खोदला खड्डा, जेवायला जायचं सांगून नेलं अन्…

शिवेंद्रराजेंकडून उदयनराजेंची उमेदवारी फिक्स
भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे यांनाच उमेदवारी मिळेल, असं भरसभेत जाहीर करून टाकले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे आणि पुढील 5 वर्षाने होणाऱ्या लोकसभेसाठी देसाई यांनी तयारी करण्याची मागणी शिवेंद्रराजे यांनी या सभेत केली आहे. तर दुसरीकडे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी या मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले आणि महायुतीच्या नेत्यांसमोर पुन्हा एकदा आपल्या उमेदवारीची मागणी केली आहे. यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.

यावर खासदार उदयनराजे यांनी नरेंद्र पाटील यांच्या भाषणाचा समाचार घेत तुम्ही शिवेंद्रराजे यांना मिसळ खायला घातली होती. पण मी या स्टेजवर बसलेल्या सगळ्यांना मिसळ खायला घालणार असल्याची मिश्किल टिप्पणी राजे यांनी केली आहे.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...