75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

petrol

Petrol-Diesesl price : सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात (Petrol price Diesesl price) करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची घसरण झाली आहे.

Petrol-Diesesl price : देशातील सर्वसामान्य जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात (Petrol Diesesl price) करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची घसरण झाली आहे. आजपासून हे दर लागू होणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, नवीन दर लागू झाल्यापासून कोणत्या शहरात, किती रुपयांना पेट्रोल-डिझेल मिळणार यासंदर्भातील माहिती पाहुयात. 

लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. केंद्र सरकारनं पूर्ण देशभरात आजपासून पेट्रोल आणि डिझेलचा(Petrol-Diesesl price) दरात दोन रुपयांची कपात केली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल पंपावर हा नवीन दर लागू झाला आहे. मुंबईत आज सकाळी 6 वाजेपासून पेट्रोलचा नवीन भाव 104.15 प्रति लीटर तर डिझेलचा भाव 92.10 प्रति लीटर झाला आहे. 

कोणत्या शहरात पेट्रोलचे(Petrol) किती दर?

शहर           जुने दर         नवीन दर

मुंबई –        106.31          104.2
कोलकाता –  106.3           103.94
चेन्नई –         102.63          100.75          
नवी दिल्ली –  96.72           94.72

कोणत्या शहरात डिझेलचे(Diesesl) किती दर?

शहर            जुने दर         नवीन दर

मुंबई –            94.27         92.15 
कोलकाता –     92.76         90.76 
चेन्नई –            94.24         92.34
नवी दिल्ली –   89.62          83.62     

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एक्स माध्यमावरुन याबाबतची घोषणा केली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात करुन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, कोट्यवधी भारतीयांच्या आपल्या कुटुंबाची सुविधा आणि त्यांचे हित जपणे त्यांचे लक्ष्य आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाल्याने केंद्र सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले होते. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी ओलांडल्याने त्याची बरीच चर्चा झाली होती. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारला अनेकदा लक्ष्यही केले होते. परंतु, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट 2 रुपयांची कपात करुन मास्टरस्ट्रोक मारला आहे 

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...