75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

जीव

मोकाट भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. वेगवेगळ्या शहरातून या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर येत असतात.

मोकाट भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. वेगवेगळ्या शहरातून या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर येत असतात. आता धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. धुळे शहरात कुत्र्यांच्या झुंडीने केलेल्या हल्ल्यात एका एक वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झालाय.

धुळे शहरातील बोरसे नगर परिसरामधील ही घटना असून खुशी तेजाब रहाशे असे या एक वर्ष मुलीचे नाव आहे. नंदुरबार जिल्ह्यातून बांधकाम मजुरीसाठी आलेले तेजाब रहाशे यांचं कुटुंब धुळ्यात बोरसे नगर मधील एका पत्राच्या झोपडीत राहत होते. खुशीची आई पहाटे प्रांत विधीसाठी बाहेर गेलेली असताना खुशी तिच्या भावासोबत घरात झोपलेली होती. यावेळी अचानक चार ते पाच कुत्र्यांनी बांधकाम सुरू असलेल्या घरात प्रवेश करत खुशीवर हल्ला केला. कुत्र्यांच्या झुंडीने खुशीच्या शरीराचे लचके थोडे तिला वरफडत नेले.

Camel Smuggling : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात

खुशीची आई प्रमिला घरी परतल्यानंतर तिने खुशीला कुत्र्यांपासून सोडवले. यावेळी खुशीच्या आई-वडिलांनी तात्काळ तिला धुळ्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात तुमच्यासाठी दाखल केलं. मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरने तिला मृत घोषित केलं. लहान बालकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची गेल्या आठवड्या भरातील ही दुसरी घटना आहे. धुळे शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून महिन्याला पाचशेहून अधिक कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहे.

एकीकडे शहरातल्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना महापालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसल आहे. कुत्र्यांच्या नसबंदी साठी टेंडर काढला असून आचारसंहिता संपल्यानंतर कारवाई करू असं महापालिका प्रशासनाचे म्हणणं आहे. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आणखी किती बालकांचा बळी जाण्याचे महापालिका प्रशासन वाट पाहणार असा सवाल नागरिक विचारत आहेत.

Samruddhi Mahamarg Accident : वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर स्कार्पिओचा ट्रकला धडकून चुराडा; अपघातस्थळावरील धक्कादायक फोटो समोर..

दरम्यान, एकट्या धुळे शहरातच महिन्याला 700 ते 800 जणांचा कुत्रे चावा घेत आहेत. यात लहान बालकांची संख्या सर्वाधिक असते. शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात एकट्या मे महिन्यात 600 जणांना श्वानदंशाची लस देण्यात आली आहे. यात नव्याने श्वानदंश झालेले 272 रूग्ण होते. तर जिल्हा रुग्णालयातही मे महिन्यात 380 जणांवर श्वानदंशानंतर उपचार करण्यात आले आहेत. धुळे महापालिकेच्या दवाखान्यातही 170 हून अधिक जणांनी रेबीजची लस घेतली.

 

जीव
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...