NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून अजित पवार गटात नाराजी असल्याची चर्चा होत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला विरोध केल्याची माहिती आता समोर येत आहे.
राज्यसभेसाठी उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भात घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घमासान झाले. नाव निश्चित करण्यासाठी आदल्या रात्री बैठक बोलावल्याच्या मुद्द्यावरून नाराजी असल्याचं समजते. पक्षात मोजकेच नेते निर्णय प्रक्रियेत सहभागी असतात यावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी मिळण्याचं जवळपास निश्चित आहे.
मंत्री छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र त्यांच्याऐवजी सुनेत्रा पवार यांचे नाव उमेवारीसाठी पुढे असल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडणार का? पक्षात भूकंप होणार अशी चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली गेली होती. मात्र सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. यानंतरच सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागणार अशी चर्चा सुरू झाली होती.
Maratha Reservation : मराठा-ओबीसी संघर्ष पेटणार? मध्यरात्री मोठ्या घडामोडी…