2024 या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 25 मार्चला होळीच्या दिवशी होत आहे. हे उपछाया चंद्रग्रहण असून, भारतीय वेळेनुसार ते 25 मार्चला सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी सुरू होऊन दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत असेल. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याने त्याचे वेध आणि अन्य नियम पाळावे लागणार नाहीत; मात्र या ग्रहणाचा काही राशींवर शुभ किंवा अशुभ परिणाम होऊ शकतो, असं ज्योतिषतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
25 मार्चचं चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे त्याच्या वेधाचे नियम पाळण्याची गरज नाही. होळी साजरी करण्यावर काहीही बंधनं येणार नाहीत. तसंच पूजा-पाठावरही काही परिणाम होणार नाही; मात्र ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, काही राशींवर याचे चांगले किंवा वाईट परिणाम होऊ शकतात. तीन राशींवर या ग्रहणाचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात, असं ज्योतिषतज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याविषयी अधिक जाणून घेऊ या.
मीन : होळीच्या दिवशी होणार असलेल्या चंद्रग्रहणाचा मीन राशीच्या व्यक्तींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्या व्यक्तींवरचा कामाचा ताण वाढू शकतो. नोकरदार व्यक्तींना काही समस्या त्रस्त करू शकतात. व्यापारी वर्गाचं नुकसान होऊ शकतं. या दिवशी कोणत्याही वादात पडू नका. होळीच्या दिवशी वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा. अन्यथा काही दुखापत होण्याची शक्यता आहे.
कर्क : होळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणं कर्क राशीच्या व्यक्तींना शुभ नाही. त्यांना आर्थिक नुकसान होण्याचे योग आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहार, गुंतवणूक आदी बाबी अत्यंत काळजीपूर्वक आणि सावधगिरीने कराव्यात. दुखापत होण्याची शक्यता असल्याने वाहन चालवतानाही सावधगिरी बाळगावी. अन्यथा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मन उदास राहण्याची शक्यता आहे. कष्ट केले तरी कामं पूर्ण होतीलच असं नाही. त्यामुळे धैर्याने परिस्थितीचा सामना करणं गरजेचं आहे.
वृश्चिक : 2024चं पहिलं चंद्रग्रहण वृश्चिक राशीच्या व्यक्तींवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतं. या व्यक्तींवर कोणी खोटे आरोप करू शकतं किंवा कोणी एखादा कट रचू शकतं. त्यामुळे या दिवशी सावधगिरीने काम करणं आणि कोणाशीही वाद टाळणं उत्तम. या दिवशी कोणतंही नवं काम सुरू करू नका. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी. प्रकृती बिघडण्यास कारणीभूत ठरू शकतील, अशा पदार्थांचं सेवन करू नये. जोडीदाराशी भांडण किंवा वाद होऊ शकतात. त्यामुळे सावध राहावं.