75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Monsoon

IMD Monsoon Forecast : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे, राज्यातील हवामानाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे.

IMD Monsoon Forecast : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून लवकरच विदर्भात दाखल होणार आहे. सध्या नागपूरसह विदर्भात ढगाळ वातावरण असून, जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गोव्याच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं, अरबी समुद्रात मोसमी पाऊस वेगानं पुढे वाटचाल करत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारपासून राज्यात पवासाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Porsche Car अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचा पाय आणखी खोलात, ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट होती, मात्र आता ढगाळ वातावरण आहे, तसेच अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात मान्सूनचं आगमण झालं आहे, पुढील 24 तासांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून या काळात हवामान विभागाकडून महाराष्ट्रात वादळाचा देखील इशारा देण्यात आला आहे. ताशी 40 ते 50 किमी इतका या वाऱ्याचा वेग राहण्याचा अंदाज आहे.

आज महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्हा वगळता राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; निकालानंतर मुख्यमंत्र्यांना सर्वात मोठा धक्का बसण्याची चिन्ह!

 
Monsoon
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...