IMD monsoon forecast : महाराष्ट्रात पुढील काही तासांमध्ये मोठं संकट, आयएमडीनं दिला धोक्याचा इशारा
IMD monsoon forecast : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मुंबई आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात थोडी वाढ होऊन ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
कोकणात पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार मराठवाड्यात देखील विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे.
आज पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.