75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Amazon

Amazon : सर्वांत अगोदर हॅकर्स तुमचं अ‍ॅमेझॉन अकाउंट अ‍ॅक्सेस करण्याचा प्रयत्न करतात. हॅकर्स तुम्हाला एक ओटीपी पाठवतात.

Amazon : सायबर क्राइम आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकांच्या फसवणुकीसाठी गुन्हेगार विविध युक्त्या शोधून काढत आहेत. हॅकर्सचे डावपेच लक्षात येणं फार कठीण असलं, तरी अशक्य नक्कीच नाही. तुम्ही थोडी हुशारी वापरली तर कष्टाचे पैसे लुटण्यापासून वाचवू शकतात. हॅकर्सनी आता अ‍ॅमेझॉनच्या नावाने फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

हॅकर्स तुमची फसवणूक करण्यासाठी ई-मेल, एसएमएस किंवा फोन कॉलचा वापर करू शकतात. त्यामुळे आपण नेहमी सावध असलं पाहिजे. तुम्ही सावध नसाल तर हॅकर्स तुम्हाला सहजपणे अडकवतील आणि तुमच्या खात्यातील सर्व पैसे काही वेळात नाहीसे करतील.

सर्वांत अगोदर हॅकर्स तुमचं अ‍ॅमेझॉन अकाउंट अ‍ॅक्सेस करण्याचा प्रयत्न करतात. हॅकर्स तुम्हाला एक ओटीपी पाठवतात. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ‘Your OTP to Sign In’ असा मेसेज येतो. ओटीपी पाठवल्यानंतर लगेचच तुम्हाला एक कॉल येतो. त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्ड केलेला आवाज ऐकू येतो. तो आवाज ऐकून असं वाटेल की, तो कॉल अ‍ॅमेझॉनमधूनच आला आहे. कॉलवर असं म्हटलं जातं, की कोणी तरी तुमचं अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या नंबरवर एक कोड आला असेल. अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी तो कोड सांगा. अशा परिस्थितीत आपण कोणताही विचार न करता घाबरून लगेच तो कोड सांगतो.

तुम्हालाही असे मेसेज किंवा फोन आल्यास घाबरून न जाता शांत डोक्याने विचार करा. कोणत्याही संशयास्पद मेसेजला रिप्लाय देऊ नका किंवा फोन कॉलवर ओटीपी शेअर करू नका. अ‍ॅमेझॉनच्या नावाने फोन आला असेल तर तात्काळ अ‍ॅमेझॉनशी संपर्क साधून त्यांना या प्रकरणाची माहिती द्या.

जर अशा प्रकारे एखाद्याची फसवणूक झाली तर वेळ वाया न घालता लगेच सायबर क्राइम पोर्टलवर जाऊन आपली तक्रार नोंदवा. याशिवाय, तुम्ही अ‍ॅमेझॉन कस्टमर केअर क्रमांकावर किंवा reportascam@amazon.in या वेबसाइटवर ई-मेल करून तक्रार नोंदवू शकता. आजकाल अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहिलं पाहिजे.

Amazon
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...