Gold-Silver Rate Today : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर दिल्लीसह देशभरातील जवळपास सर्वच शहरात सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. जाणून घेऊयात सोने-चांदीचे दर
Gold-Silver Rate Today : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर दिल्लीसह देशभरातील जवळपास सर्वच शहरात सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केली त्याचा मोठा परिणाम हा सोन्याच्या दरावर झाला आहे.
गेल्या सहा दिवसांमध्ये सोन्याचे दर तब्बल 7269 रुपयांनी घसरले आहेत. ही घसरण पुढील काही दिवस अशीच चालू राहण्याची शक्यता आहे.
राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 64200 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 67410 रुपये इतका आहे.
आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 68131 रुपये होता, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 62408 रुपये होता.
तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे, सध्याचा चादींचा दर 81271 रुपये प्रतिकिलो एवढा आहे.
याआधी सोनं 72 हजारांच्या जवळपास होतं. मात्र कस्टम ड्युटी कमी झाल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते थोडे-थोडे करून खरेदी करू शकता.