75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

फराह खान

दिग्दर्शक फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खान यांची आई मेनका इराणी यांचं निधन झालं आहे.

प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानवर (Farah Khan) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फराह खानच्या आईचं निधन झालं आहे. फराह खानची आई मेनका इराणी यांचं वयाच्या 79 व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मेनका इराणी यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे. गेल्या काही काळापासून त्या आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही महिन्यांपूर्वीही त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. 

फराह-साजिद खानवर कोसळला दु:खाचा डोंगर

कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खान यांची आई मेनका इराणी यांचं निधन झालं आहे. मेनका इराणी या दीर्घकाळ आजारी होत्या आणि गेल्या काही महिन्यांत त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फराह आणि साजिदची आई मेनका इराणी वृद्धापकाळामुळे दिर्घकाळ आजाराने त्रस्त होत्या, मात्र त्यांच्या मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

आईच्या मायेचं छत्र हरपलं

गेल्या वेळी, मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. उपचार आणि डिस्चार्ज झाल्यानंतर मेनका घरी परतल्यानंतर फराहने आईचा वाढदिवस साजरा केला. 12 जुलै रोजी फराहने आईचा वाढदिवस साजरा केला आणि सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करून तिला शुभेच्छाही दिल्या होत्या.

फराह खान आणि साजिद खानची आई मनेका इराणी यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण बॉलिवूड शोककळा पसरली आहे. फराहने दोन आठवड्यांपूर्वीच तिच्या आईचा 79 वा वाढदिवस साजरा केला होता. आईच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने एक अतिशय भावनिक पोस्टही शेअर केली होती. आईच्या निधनानंतर फराहची ती पोस्ट आता व्हायरल होत आहे.

मेनका इराणी या प्रसिद्ध बाल कलाकार डेझी इराणी आणि लेखिका हनी इराणी (जावेद अख्तरची माजी पत्नी) यांच्या बहिण होत्या. मनेका इराणी या एक अभिनेत्री होत्या. 1963 मध्ये रिलीज झालेल्या ‘बचपन’ चित्रपटात मनेका इराणी यांनी काम केलं होतं. हा चित्रपट सलीम खान यांनी लिहिला होता.

फराह खान
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...