75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Earthquake

Earthquake : वाशिम जिल्ह्याच्या रिसोड, वाशिम तालुक्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी दोन वेळा 3 ते 5 सेकंद हे धक्के जाणवले आहेत.

Earthquake :  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जिल्ह्याच्या रिसोड, वाशिम तालुक्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. याशिवाय हिंगोली, याशिवाय हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच जमिनीतून गूढ आवाजही आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे

वाशिम जिल्ह्याच्या रिसोड, वाशिम तालुक्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी दोन वेळा 3 ते 5 सेकंद हे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी सव्वा सात वाजेच्या दरम्यान जिल्ह्यातील पाचही तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे सकाळी 07:14 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंपाची नोंद झाली आहे.

परभणी शहर आणि परिसरात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. नांदेड शहरात सकाळी सव्वासात वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. उत्तर नांदेड शहरासह अर्धापूर तालुक्यात काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, सौम्य धक्क्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. राज्यात कुठेही भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास धक्के बसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. भूकंपांच्या धक्क्यामुळे छताचे पापुद्रे पडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, प्रशासनाकडून पाचोड परिसरातील भूकंपाला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

बीडच्या गेवराई ,माजलगाव आणि परळी तालुक्यांतही आज सकाळीं 7.15 मिनिटांनी काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले . कुठल्याही पद्धतीची हानी झालेली नाही. मात्र यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हिंगोलीमध्ये भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी संकेत स्थळावर देण्यात आली आहे..

Earthquake
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...