75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही काळात तीव्र उष्णतेची लाट असून पारा 40 पार पोहोचलाय. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात 7 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानात घट होण्याची चिन्हे आहेत. मात्र विदर्भात गारपीटीची शक्यता असल्याने बळीराजाला नव्या संकटाला सामोरं जावं लागेल. तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी भागात देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईतील तापमानात पुन्हा वाढीची शक्यता

मुंबई आणि ठाण्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. राजधानीत 38 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचेल असा अंदाज आहे. तर 7 एप्रिल रोजी मुंबईतील कमाल तापमान 35 अंश तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर आकाश निरभ्र राहील, असं हवामान विभागानं सांगितलंय.

Crop Insurance : फक्त ‘त्या’ शेतकऱ्यांनाच मिळणार पीक विम्याचा लाभ, नव्या निर्णयामुळे बसणार मोठा फटका?

पुण्यात ढगाळ वातावरण

गेल्या काही दिवसांत पुण्यातील तापमानाचा पारा 40 अंशावर पोहोचला होता. मात्र 7 एप्रिल रोजी तापमानात घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 39 अंशांवर राहणार असून वातावरण ढगाळ राहील, असा अंदाज आहे.

कोल्हापुरातील कमाल तापमानात घट

कोल्हापुरातील कमाल तापमानात घट झाली आहे. गेल्या काही दिवसांत 40 च्या घरात गेलेला पारा 37 अंशांवर आला आहे. 7 एप्रिल रोजीही तापमानात फारसे बदल होणार नाहीत. वातावरण ढगाळ राहणार असून तापमान 37 अंशांच्या आसपासच राहील, असं हवामान विभागानं म्हटलंय.

नाशिकमध्ये पावसाची शक्याता

उत्तर महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिकमध्ये 7 एप्रिल रोजी कमाल तापमान 36 तर किमान 21 अंशापर्यंत राहण्याचा अंदाज आहे. तर आकाश ढगाळ राहणार असून पावसाचीही शक्यता आहे.

मराठवाड्यात अवकाळी पाऊस

मराठवाड्यातही काही भागात पावसाच्या सरी कोसळणार आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 एप्रिल प्रमाणेच 7 एप्रिल रोजीही तापमान असणार आहे. कमाल तापमान 38 अंश तर, किमान 25 अंश सेल्सअस राहणार असण्याची शक्यता आहे. सोबतच पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

विदर्भात तापमानात घट

विदर्भात उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली होती. पारा 42 अंशांपर्यंत पोहोचला होता. मात्र, 7 एप्रिल रोजी वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. गारपीटीसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात मोठी घट होणार आहे. नागपुरातील तापमान 4 अंशांनी घटून 38 वर पोहोचणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय.

महाराष्ट्रावर आलेल्या उकाडा आणि अवकाळी या दुहेरी संकटाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. या अवकाळीचा फटका सर्वाधिक फळबागांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांनी सावध राहून आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.

Loksabha elections 2024 : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना धक्का; एकनाथ शिंदेंच्या गळाला लागला ‘मोठा मासा’

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...