75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Crime

Crime News : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ऑनर किलिंगच्या घटनेनं शहर हादरलं आहे.

Crime News : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. आंतरजातीय विवाह केल्यानं एकाची हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या वडिलांनी आणि भावानेच तिच्या पतीची हत्या केली आहे. अमित साळुंखे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तो इंदिरा नगर भागात राहत होता, त्याचं आपल्या बालपणीच्या मैत्रिणवर प्रेम होतं, दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. मात्र याचा राग आल्यानं मुलीच्या भावानं आणि वडिलांनी या तरुणाची हत्या केली आहे. आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी तरुणाच्या कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

Viral News : लग्नाला 57 वर्षे, पतीने पत्नीचे केले 57 तुकडे; पोलिसांना सांगितलेलं कारणही धक्कादायक

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ऑनर किलिंगच्या घटनेनं छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडाली आहे. आपल्या मुलीसोबत आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून वडिलांनी आणि मुलीच्या भावानं तरुणाची हत्या केली आहे. अमित साळुंखे असं या तरुणाचं नाव आहे. तो शहरातील इंदिरा नगर भागातील रहिवासी होता.

अमितने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. मात्र मुलीच्या वडिलांनी आणि भावाने अमित वर 14 जुलै रोजी चाकू तलवारीने हल्ला केला. उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाला. अमितच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाई आक्रमक झाले आहेत. फरार आरोपींना तातडीनं अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे. नातेवाईकांकडून जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

Crime
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...