75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

pune rain

Pune Rain : पुणे शहर पूराच्या विळख्यात सापडलं आहे. तर हा पूर पावसामुळे नव्हे तर धरणातून अधिक पाणी सोडल्यामुळे आलाय, असा दावा भाजप नेते मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.

Pune Rain : पुणे, पिंपरी-चिंचवड ही शहरं काल रात्रीपासून पूराच्या विळख्यात सापडली आहेत. खडकवासला धरणातून विसर्ग सुरूच आहे. तर अतिवृष्टीमुळे हा पूर आल्याचा अंदाज आतापर्यंत वर्तवला जात होता. मात्र आता याबाबत भाजपा खासदार मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांसमोर येत धक्कादायक खुलासा केला आहे. “पुण्यात पूर अतिवृष्टीमुळे नव्हे, तर धरणांतून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे आला,” असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?

पुण्यातील पुरस्थितीवर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “आवश्यकतेनुसार खडकवासला धरणातून काल रात्री 35 हजार क्यूसेक पाणी सोडणं गरजेचं होतं. परंतु 55 हजार क्यूसेक पाणी सोडलं गेलं. आणि याच कारणामुळे पुण्यात पुरस्थिती निर्माण झाली.” असं म्हणत मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला पूर्णत: उघडं पाडलं आहे. प्रशासन आतापर्यंत फक्त 35 हजार क्युसेक पाणी सोडल्याचा दावा करत होतं. तो दावा आता मुरलीधर मोहोळ यांनी खोडून काढला आहे. याबाबत मुरलीधर मोहोळ प्रशासनाची बैठक घेणार असल्याची बाब समोर येत आहे.

Bank scam : महाराष्ट्रातील आणखी एका बँकेत हजारो कोटींचा घोटाळा, आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुण्यात पूरामुळे हाहाकार:

बुधवारी रात्रभर पडलेल्या पावसाने पुणे जलमय झालं असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शहरात अनेक ठिकाणी इमारतींमध्ये पाणी शिरलंय. काही ठिकाणी लोक अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि बचावपथक कार्यरत आहेत. दरम्यान, खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. पुण्यात गेल्या 24 तासात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यात एकाच ठिकाणी तिघांचा शॉक लागून मृत्यू झाला तर एकाचा दरड अंगावर कोसळल्यानं मृत्यू झालाय.

राज्याला अतिवृष्टीचा अलर्ट:

राज्यात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील करण्यात येतं आहे. पुणे, मुंबई, कोकण, सातारा आणि कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यभरातील सातारा, पुणे, कोकणातील शाळांना उद्यासाठी सुट्टी देखील जिल्हा प्रशासनाक़डून जाहीर करण्यात आली आहे.

Pune Weather News : पुण्याला 32 वर्षात पहिल्यांदा पावसाने एवढं धु- धु धुतलं, हवामान तज्ज्ञांची माहिती

Pune
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...