Crime News : अविवाहित महिलेच्या नावावर असलेल्या खोलीसाठी भाऊ आणि भावजयीने निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून फक्त धड नदीपात्रात फेकलं.
Crime News : खराडी येथे सापडलेल्या शीर हात पाय नसलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा झालाय. तो मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा असल्याच समोर आलंय. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सख्खा भाऊ आणि वहिनीने सकीना खानची निर्घृणपणे हत्या केलीय. अविवाहित महिलेच्या नावावर असलेल्या खोलीसाठी भाऊ आणि भावजयीने निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून फक्त धड नदीपात्रात फेकलं. या प्रकरणी पोलिसांनी भाऊ अशपाक आणि त्याच्या पत्नीला अटक केलीय.
याबाबत मिळालेली माहिती असी की, ४८ वर्षीय सकिना खान असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. शिवाजीनगर येथील भैय्यावाडी येथे दहा बाय दहा बायच्या खोलीत सकीना खान, तिचा भाऊ अशपाक खान, हमिदा खान हे तिघे एकत्र रहात होते. सकिना या झाडू काम करीत उदरनिर्वाह करत होत्या. सकिना यांच्या नावावर असलेली खोली अशपाक यांना स्वत:च्या नावावर हवी होती. त्यावरून या तिघांमधे सतत वाद सुरू होते. शेवटी दोघांनीही मिळून सकीना यांना संपवण्याचा ठरवलं.
सकिना खान यांच्या हत्येसाठी अशपाकने लवकरात लवकर मुलीचं लग्न केलं, तर मुलाला जमातसाठी बाहेर गावी पाठवलं. त्यानंतर प्री प्लॅन करून पावसाच्या आवाजात बाजूच्या लोकांना काही न कळता सकीना यांचा गळा आवळून खून केला. इतकंच नाही तर घरातच धारदार शस्त्राने मृतदेहाचे शीर हात पाय धडावेगळे करून ज्या संगमवाडी इथल्या नदीपात्रात फेकून दिले.
खून केल्यानंतर सकिना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजाऱ्यांना दिली. मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर भांडणाची कल्पना असल्याने ही माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली आणि त्यानंतर नातेवाईंकाचा तपास करत असताना पोलिसांना या हत्येचा उलगडा झाला. २३ ऑगस्टला रात्री सकीना यांचा गळा आवळून हत्या करण्यात आली आणि डोकं हात आणि पाय धडा वेगळे केले आणि नदीत फेकून दिले. २६ ऑगस्टला खराडी येथील नदीमध्ये स्थानिकांना मृतदेहाच धड आढळून आल्यानं खळबळ उडाली होती.
शीर, हातपाय नसलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. यानंतर पोलिसांनी युद्ध पातळीवर संपूर्ण परिसराची ड्रोन द्वारे पाहणी केली. यानंतर या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन तपास करण्याचा प्रयत्न केला पण फार यश आल नाही. अखेर पोलिसांनी माहिती देणाऱ्याला इनाम घोषित केलं. शिवाजीनगरला भैय्यावाडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सकीना गेले काही दिवस दिसत नसल्याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना तपासाची दिशा सापडली आणि सकीना यांचा भाऊ आणि वहिनीकडे चौकशी केली. तेव्हा ६४ स्क्वेअर फूटाच्या खोलीसाठी बहीणीचा खून केल्याच या दोघांनी कबूल केलं. यानंतर पोलीसांनी सकिनाचा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केलीय.