75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

crime

Crime News : बंदुकीचा धाक दाखवून गोदावरीवरील बापू पुलाजवळून एका व्यावसायिकाचे अपहरण करून साडेबारा लाखाची खंडणी उकळणाऱ्या तिघांना नाशिक शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून सहा लाखांहून अधिक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट एकने ही कामगिरी केली. सोमवारी अपहरणाची घटना घडली होती. राजेशकुमार गुप्ता या फॅब्रिकेशन व्यावसायिकाचे बंदुकीचा धाक दाखवत टोळक्याने मोटारीतून अपहरण केले. गुप्ता यांच्या एटीएमचा वापर करून ३० हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच गुप्ता यांच्या पत्नीकडून १२ लाखांची खंडणी उकळण्यात आली. दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशातील देवास येथे गुप्ता यांना सोडून देण्यात आले होते.(crime news)

या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणातील संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखा युनिट एकला मार्गदर्शन केले. या पथकाने घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची नावे निष्पन्न करण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी संशयितांना पकडण्यासाठी दोन पथके तयार केली. एका पथकाने आदित्य सोनवणे (२४, म्हाडा कॉलनी, अंबड लिंक रोड) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून मोटारसायकल, महागडा भ्रमणध्वनी, सोन्याचे दागिने, रोकड असा सुमारे एक लाख ५९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

दुसऱ्या पथकाने तुषार खैरनार (२८, सिध्दी अपार्टमेंट, म्हसरूळ) आणि अजय प्रसाद (२४, अंबड लिंक रोड) या दोघांना सापळा लावून पकडले.(crime news) त्यांच्याकडून मोटार, भ्रमणध्वनी असा तीन लाख ८७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या संशयितांना पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक विष्णू उगले, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रवींद्र बागूल, हवालदार मंगेश साळुंखे, प्रदीप म्हसदे, नाझीम पठाण, विशाल काठे, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...