75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Crime

Crime News : दिनांक 07/03/2024 रोजी गोपनीय बातमीदारमार्फत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना बातमी मिळाली की, राहुरी येथे बँकेच्या कॅश पार्टीवर पाळत ठेवून दरोड्याच्या तयारीने बिहार राज्यातले 6 आरोपी हे राहुरी येथे आलेले आहे. प्राप्त गोपनीय बातमीच्या आधारे नगर ते मनमाड जाणारे रोडवरील, राहुरी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, राहुरी शाखा समोर रोडवर दुपारी 16.45 वा. सुमारास छापा टाकुन दरोड्याच्या तयारीत असणारे आरोपी नामे 1) राहुल कुमार गुलाबचंद यादव (वय 23 वर्ष), 2) सिंटु कुमार रामसिंग यादव, (वय 29 वर्षे, राज्य बिहार पोलीस स्टेशन कोडा),

3) अजित ऊर्फ गौतम गुरुददीन यादव, 4) चंदन कुमार गुल्ला यादव (सर्व रा. नथीला, नयाटोला जुराबगंज, ता. जि. काठियार, राज्य बिहार पोलीस स्टेशन कोडा) हे एकूण 1 लाख 03 हजार 050/- रुपये रोख रक्कम, लोखंडी टॉमी, सुरा, दोरी, लाल मिर्च पावडर, बॅटरी, कत्ती, हेल्मेट, कापडी पिवशी, सिमकार्ड, सॅग, शर्ट, पॅन्ट, नंबर प्लेट, क्रु डायव्हर, पान्हा , २ चोरीच्या मोटर सायकल (किंमत 1,00,000/- रुपय) अशा मुददेमालासह दरोडा टाकण्याचे उददेशाने एकत्र जमवून पूर्व तयारी करुन घातक शस्त्रांसह मिळून आले.

घटनास्थळावरुन आरोपी 5) रमन मुन्ना यादव , 2) शंभु किस्टो यादव (सर्व रा. नथीला, नयाटोला जुराबगंज, ता. जि. काठियार , राज्य बिहार पोलीस स्टेशन कोडा) हे घटना ठिकाणावरुन अपाची मोटर सायककलवरुन पळून गेले आहेत. आरोपींविरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर I 251/2024 भा.दं.वि.कलम 399,402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास सहा.पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे राहुरी पोलीस स्टेशन हे करत आहेत. गुन्हयातील अटक आरोपींकडे करण्यात आलेल्या तपासामध्ये त्यांनी सोलापूर, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर शहरामध्ये जबरी चोरी केल्याची कबुली दिली असून ३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...