75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

संभाजीनगर

जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा धक्का लागल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे. हृदयविकाराच्या धक्क्यानंतर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा धक्का लागल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे. हृदयविकाराच्या धक्क्यानंतर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. सिमरन मोटरचे मालक कवलजीत सिंग बग्गा आपल्या सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये आले होते. व्यायाम करत असतानाच ते अचानक खाली कोसळले आणि काही क्षणामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

कवलजीत सिंग बग्गा यांच्या मृत्यूचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये कवलजीत सिंग बग्गा जिममध्ये सहकाऱ्यांसोबत व्यायाम करताना दिसत आहेत. व्यायाम सुरू असतानाच कवलजीत सिंग यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. यानंतर जिममधले सहकारी कवलजीत सिंग यांची मदत करण्यासाठी धावले. खाली कोसळल्यानंतर कवलजीत सिंग यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कवलजीत सिंग यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

व्यायाम करताना का येतो हृदयविकाराचा धक्का?

जिम करताना, मैदानात खेळ खेळताना इतकेच नाही तर डान्स करतानाही अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढत आहे. हृदयविकाराचा धक्का येऊ नये, यासाठी काय काळजी घ्यायची याबाबत कोल्हापूरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी माहिती दिली आहे.

खरंतर हृदयविकराच्या घटना वाढण्याची कारणे भरपूर आहेत. कारण आजकालच्या जीवनातील बदलांमुळे रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर अनुवंशिकतेमुळे देखील एखाद्या व्यक्तीला हृदयरोग असू शकतो. पण बऱ्याचदा त्या गोष्टीबद्दल त्या व्यक्तीला काहीच माहिती नसते. अशावेळी त्या व्यक्तीने अचानक जास्त धावपळ किंवा कष्टाची कामे केली, तर अनुवंशिकतेचा परिणाम होऊन हृदयावर जास्त ताण पडून एकाएकी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळेच अचानक जास्त व्यायाम, शारीरिक श्रमाच्या गोष्टी करणे हे आपल्यासाठी घातकच ठरु शकते, असे डॉ. बाफना यांनी सांगितले आहे.

संभाजीनगर
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...